Breaking

सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

उमरा सर्कल मधील कार्यकर्त्यांच्या व पदाधिकार्‍यांच्या वतीने आमदार श्याम सुंदर शिंदे यांचा भव्य सत्कार आमदारांना मात्र साठवण तलावाच्या मंजुरीसाठी "उमरा" गावाचा विसर,उमरा गावकऱ्यांच्या मनात प्रचंड नाराजी



उमरा सर्कल मधील कार्यकर्त्यांच्या व पदाधिकार्‍यांच्या वतीने आमदार श्याम सुंदर शिंदे यांचा भव्य सत्कार 


आमदारांना मात्र साठवण तलावाच्या मंजुरीसाठी "उमरा" गावाचा विसर,उमरा गावकऱ्यांच्या मनात प्रचंड नाराजी

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

 लोहा: लोहा ,कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी मोठ्या प्रयत्नाने लोहा, कंधार मतदार संघात नवीन २४ जलसिंचन प्रकल्पाला शासनाची मंजुरी  मिळवून आनल्यामुळे या भागातील हजारो हेक्टर शेतीला या नवीन जलसिंचन प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे, उमरा सर्कल मध्ये नुकत्याच मंजूर झालेल्या नवीन जल सिंचन प्रकल्पाचा समावेश असल्याने उमरा सर्कलमधील सरपंच, उपसरपंच व कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांच्या वतीने आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला, यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील उपस्थित होते.

उमरा सर्कल मधील ८ सिंचन तलावाला जरी मंजुरी मिळाली असली तरी,उमरा गावच क्षेत्र पहाता किमान ४ तरी सिंचन तलावाला मंजुरी मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती.बहुसंख्य वाडी,तांडे लोकवस्ती असलेल्या उमरा गावाचा मात्र यामध्ये समावेश नसल्याने लोकप्रतिनिधींना व कार्यकर्त्यांना उमरा गावाचा विसरच पडला का ? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर दिसून येत आहे.याचा परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवर दिसून येऊ शकतो हे मात्र नाकारता येत नाही.

सत्कार समारंभावेळी मारतळ्याचे सरपंच भास्करराव पाटील ढेपे,  जोमेगावचे माजी.सरपंच आदिनाथ पाटील शिंदे, धनंज (बु) चे माजी सरपंच पप्पू भूरे , गोळेगाव चे सरपंच कैलास पाटील ढाले, सुगाव चे सरपंच विजय पा.जाधव, प्रभाकर शिंदे, मनोहर भुरे, सचिन कुदळकर, ज्ञानेश्वर पाटील ढेपे, बालाजी बीचेवाड,काशीराम गायकवाड, नागोराव कापसे, रामा कापसे, सुरेश ढगे, कैलास कोल्हे, पत्रकार बाळासाहेब शिंदे, श्याम सावळे,मनोहर ढेपे,रणजित शिंदे, दादाराव ढगे,सह उमरा सर्कल मधील शेकडो कार्यकर्त्यांसह सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच यांच्या वतीने लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे, युवा नेते विक्रांत दादा शिंदे यांचा भव्य सत्कार करून अभिनंदन करण्यात आले, यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित असलेल्या विविध अशासकीय समितींच्या निवडी व संजय गांधी निराधार योजना समिती  लवकर गठीत करण्याची  मागणी आ. श्याम सुंदर शिंदे यांच्या कडे केली, लोहा ,कंधार तालुक्यातील सर्व अशासकीय  समित्या लवकरच गठीत करण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार शिंदे यांनी बोलताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा