Breaking

सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या चौकाचे मा.आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते अनावरणधामनदरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा


.हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या चौकाचे मा.आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते अनावरण


धामनदरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट


किनवट: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राज्यात ठीक ठीकाणी सुरु असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्या मेळाव्याच्या अणूषंगाने दिनांक ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे दिर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या दिवसा चे औचित्यसाधुन किनवट तालुक्यातील मौजे धामनदरी येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता यामध्ये माजी आ. प्रदीप नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती तर राष्ट्रवादी क़ॉग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी देखिल उपस्थित होते.
१२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस असल्याने त्या अणूषंगाने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षा तर्फे प्रत्येक तालुकास्तरावर कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात येत आहे त्या अणुषंगाने किनवट तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड, विधानसभा अध्यक्ष राहुल नाईक, युवक अध्यक्ष अजित साबळे यांच्या नेत्रुत्वाखाली मौजे धामनदरी येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. तर १२ डिसेंबर रोजी खा.शरदचंद्र पवार यांची वर्च्युवल रॅली हि किनवट येथे ऑनलाईन स्वरुपात प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना माजी आ.प्रदीप नाईक यांनी सांगितले कि, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातुन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांची कामे करावीत जेणे करुन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची व पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार यांच्या सर्वधर्म समभाव ची विचारधारा देखिल जणमाणसात पोहचेल जेणे करुन या मध्यमातुन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या मार्फत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सत्तेचा उपभोग घेऊन जनतेमध्ये स्थान प्राप्त करता येईल त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांने सतत जनतेमध्ये रहावे जेणे करुन त्यांना त्यांच्या निवडणुकांना सामोरे जाताना जास्त त्रास होणार नाही. तर कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर या माध्यमातुन जनतेची कामे सोडवण्यासाठी उपयोगात आणावे असे हि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तर आजच्या स्थितीला ८१ वर्षाचे होऊन देखिल एखाद्या तारुण्याला लाजवेल अशी स्फुर्ती खा.शरदचंद्र पवार हे दाखवत आहेत त्यांच्या स्फुर्तीतुन तरुणांनी आदर्श घ्यावा.
तर आयोजित मेळाव्याच्या ठीकाणी मौजे धामनदरी येथे माजी मुख्यमंत्री हरीत क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या चौकाचे अनावरण करण्यात आले. तर आयोजित कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश राठोड, समाधान जाधव, जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे, बाजार समितीचे सभापती अनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधुकर राठोड,  सौ म्याकलवार, सौ सुनयना विशाल जाधव, प्रविण म्याकलवार, बंडु नाईक, दताराम मोहिते, माजी नगराध्यक्ष साजिद खान, विजय खुपसे, अरुण आळणे, गटनेते जहिरोद्दीन खान, शेख अफरोज, शेख सलिम मदार, वैजनाथ करपुडे पाटील, डॉ रोहिदास जाधव,  ऍड राहुल नाईक, पांडुरंग राठोड, गजानन मुंडे पाटील, कचरु जोशी, संचालक पंडित राठोड बालाजी बामणे, जयवंत वानोळे, संदिप जोमदे पाटील, आशिष केवलसिंग नाईक, शेख सरु, नागनाथ भालेराव, विनोद नाईक, के. जी राठोड, नंदु पाटील क-हाळे, नागोराव जाधव, पत्रकार कैलास बेहरे, दुर्गादास राठोड, जयपाल जाधव, कपिल सातव, पृथ्वीराज आडे, शेख पाशा खाटीक,  कैलास अंबाडी, महाविर आडे, अंबाडी चे सरपंच प्रेमसिंग जाधव, अमरदिप कदम, प्रकाश बेंद्रे पाटील, राजु पाटील सुरोशे, सरपंच गोविंद, ताहेर भाई, नईम भाई, प्रफुल्ल जाधव, दिलिप पाटील यांच्यासह विविध गावाचे मानकरी, पाटील, कारभारी , ग्राम पंचायत सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर धामनदरी येथिल अनिल नाईक मित्रंमंडळातर्फे सर्वांचे सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिल नाईक, राहुल नाईक, विनोद नाईक, सतिष नाईक यांच्यासह नाईक कुटुंबियांनी परिश्रम घेतले तर यांना ता. अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा