Breaking

मंगळवार, ७ डिसेंबर, २०२१

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन*



*यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन*


तुळजापूर:-येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास (दादा) बोरगावकर साहेब यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून  पूजन करण्यात आले.सर्वांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रो. डॉ. अनिल शित्रे, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शिवाजी जेटीथोर,डॉ. एन. एस. कदम, प्रा. बोपलकर,प्रा. जी. व्ही.पाटील,प्रा. अनंत माने, प्रा. गायकवाड, प्रा. अमोद जोशी,डॉ. मंदार गायकवाड, हणमंत भुजबळ,जनार्धन पाटील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विध्यार्थी-विध्यार्थीनीं उपस्थित होते.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा