Breaking

बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

तुळजापूर शहर व तालुक्यातील अवैद्य धंदे बंद करण्यात यावे,या मागणीसाठी भिम-अण्णा सामाजिक संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन*


*तुळजापूर शहर व तालुक्यातील अवैद्य धंदे बंद करण्यात यावे,या मागणीसाठी भिम-अण्णा सामाजिक संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन*


तुळजापूर शहर व तुळजापूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्या संबंधी निवेदन भिम-अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने तहसीलदार व तुळजापूर पोलिस स्टेशन येथे देण्यात आले.
    तुळजापूर शहर व तुळजापूर तालुक्यामध्ये दारू, जुगार,गुटखा, डान्सबार असे समाज घातकी अवैध धंदे सर्रास चालू आहेत.अशा अवैध धंद्यामुळे तरूण पिढी व्यसनांच्या आहारी जात आहेत तसेच तुळजापूर हे तिर्थक्षेत्र असुन तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी बाहेरून मोठ्या संख्येने भाविक येत असतात परंतु शहरातील व परिसरातील अशा अवैध धंद्यामुळे तिर्थक्षेत्र तुळजापूर चे पावित्र्य खराब होत आहे.अशा पद्धतीने अवैध धंदे बंद करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.पोलिस प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा येणाऱ्या काळात भिम-अण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा