Breaking

शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

दिव्यांग नव्हे तुफानातील दिवे--जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीम अस्मिताताई कांबळे


*दिव्यांग नव्हे तुफानातील दिवे--जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीम अस्मिताताई कांबळे 




जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांग कर्मचारी संघटनेकडून जागतिक दिव्यांग दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीम अस्मिताताई कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील व समाज कल्याण सभापती श्री दिग्विजय शिंदे, जि.प, सदस्य श्रीम उषा यरकळ, श्री कल्याण बेताळे,अरुण शेंदारकर,मयुर काकडे उपस्थित होते. होते. कोरोनामुळे दिवंगत झालेल्या दिव्यांग कर्मचाय्रांच्या पाल्याना दिव्यांग कर्मचारी संघटनेकडून शैक्षणिक कर्तव्य निधी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते खालील पुरस्काराचे वितरण करण्यात आले. दिव्यांग भूषण पुरस्कार कै. महादेव निवृत्ती कोळेकर मरणोत्तर, महिला व बालविकास अधिकारी श्री बळीराम निपाणीकर, दिव्यांग सेवा गौरव पुरस्कार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील व समाज कल्याण अधिकारी श्री नागनाथ चौगुले, दिव्यांग सन्मित्र पुरस्कार शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुरेश वाघमारे, रोटरी क्लब उमरगा अध्यक्ष श्री प्रविण स्वामी, प्रेस फोटोग्राफर श्री आरीफ शेख, अवलिया चित्रकार श्री महेश मस्के दिव्यांग रत्न पुरस्कार श्रीम वृंदा कुलकर्णी, डॉ मन्मथ माळी, श्री प्रकाशसिंग तोमर, गोविंद बाचेवाड, नारायण शिंदे, रमेश नाईकवाडे, दत्तात्रय आलुरे, दत्तात्रय मोहिते, प्रा दत्तात्रय कोटरंगे यांचा तर कै. गीता बाबुराव पवार स्मृती श्रीम दैवशाला कांबळे श्रीम मंगल दराडे याचां तर दिव्यांग कोवीड योद्धा पुरस्कार डॉ दयानंद कवडे, डॉ गोविंद साठे, वसुदेव जोगदंड, गणेश बडुरे, सुधाकर जाधव, कलावती कांबळे, रुपाली धावारे, संतोष ढवळे, नीता ढवळे यांचा सन्मान करण्यात आला. दिव्यांगातून पदोन्नती झालेले श्री रमाकांत वाघचौरे, श्री भारत देवगुडे, श्री संपत गायकवाड, श्री सतिश शिंदे, श्री धनाजी खरात यांचा सत्कार करण्यात आला. रक्तदान केलेले श्री दिपक जकाते, श्री नागनाथ कस्पटे, श्री हिरालाल गिरी यांचा गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष श्री महादेव शिंदे यांनी केले. श्री प्रविण स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात श्री अस्मिताताई कांबळे यांनी दिव्यांगासाठी जिल्हा परिषद राबवित असलेल्या विविध योजना व उपक्रमाची माहिती दिली. सुत्रसंचलन श्री बापू भंडारे यांनी केले. श्री सुधीर काळे यांनी आभार मानले. यावेळी श्री नागेश कदम, महादेव विटकर, बाबु पवार, ज्ञानदेव माने, शहाजी कोकाटे, दत्तू दंडगुले,दादा घोगरे,आशा कांबळे, दिपाली पाटील,रमाकांत जगताप यांच्यासह जिल्हाभरातून अनेक दिव्यांग कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा