Breaking

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

स्त्री शक्ती महिला मंडळ व सखी सुगरण ग्रुप टेंभुर्णी येथे तिळगुळ स्नेह मेळावा साजरा



स्त्री शक्ती महिला मंडळ व सखी सुगरण ग्रुप टेंभुर्णी येथे तिळगुळ स्नेह मेळावा साजरा 


टेंभुर्णी प्रतिनिधी :-स्त्री शक्ती महिला मंडळ व सखी सुगरण ग्रुप टेंभुर्णी यांच्या वतीने आज तिळगूळ स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला . या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षपदी स्त्री शक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती शिलाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाने  तिळगुळ स्नेह मेळाव्याचे आयोजन शंकर लॉन्स टेंभुर्णी येथे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राची कुलस्वामिनी  तुळाजाभवानीची पूजा व जिजाऊ मासाहेब सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून करण्यात आली.  या वेळी तिळगुळ व प्रत्येक व्यक्ती एक वृक्ष वान म्हणुन देण्यात आले. या प्रसंगी मंडळाच्या उपाध्यक्षा जयश्री ताबे , सुवर्ना भोसले , कुसुम फाळके, आशा घोळवे, शीला गायकवाड, प्रभावती यादव , कांबळे मॅडम ,वैशाली शिंदे, अरगडे, सविता जगताप, सुप्रिया भोसले, मनीषा भोसले , भाग्यश्री पाटील, नंदा मोरे,  निशिगंधा मस्के आदी जण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा