Breaking

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

विज बिल वसूल करणाऱ्या वायरमनला धक्काबुक्कीमहिनाभरातील दुसरी घटना



विज बिल वसूल करणाऱ्या वायरमनला धक्काबुक्की
महिनाभरातील दुसरी घटना
महाड - प्रतिनिधी
महाड तालुक्यातील वरंध गावामध्ये थकित विज बिल वसुली करता गेलेल्या महावितरणच्या बाह्य स्थित वायरमन ला मारहाण करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा महाडमध्ये थकीत वीज दुलाजी वसुली पथकाने वीज मीटर काढून घेण्याचा प्रयत्न केला असता या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाली आहे याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. 
थकीत वीज बिलांची वसुली करिता महावितरणचे कर्मचारी गावागावात जाऊन ज्यांची थकबाकी आहे अशा  ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील वरंध विभागात काम करणारे कंत्राटी वायरमन समीर एकनाथ मोरे हे दिनांक 23 जानेवारी रोजी वीजबिल थकीत वसुली करत असताना गावातील राजेंद्र वसंत धनावडे यांच्याकडे 45 दिवसाच्या वरील थकबाकी असल्याने धनावडे यांच्याकडे वायरमन समीर मोरे गेले असता धनावडे यांनी शिवीगाळ आणि मारहाण केली होती ही घटना ताजी असतानाच आज दिनांक 29 जानेवारी रोजी महाड शहरातील सिटी गार्डन अपार्टमेंट मधील तुषार सुरेश आठवले या ग्राहकाचा वीज पुरवठा थंडीत करण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांना सदर ग्राहकाने धक्काबुक्की केली. याबाबत महावितरणचे कर्मचारी गणेश तुकाराम पाचपोहे गोरेगाव यांनी महाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात भा द वि 353, 341, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा