के. एन. भिसे आर्टस, कॉमर्स व विनायकरावजी पाटील सायेन्स कॉलेज मधील एन.सी.सी. विभागातील सोहेल शेख कॅडेटची प्रजासत्ताक दिन कॅम्पमध्ये यशस्वी कामगिरी.
कुर्डूवाडी:-सोहेल शेख हा अतिशय गरीब कुटुंबातील एन.सी.सी. कॅडेट असून, त्याने संस्थेचे अध्यक्ष मा. विनायकरावजी पाटील, सचिव मा. बाळासाहेब भिसे, प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील व प्रा. लेफ्टनंट डॉ. एम. एस. थोरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील परेड मध्ये अतिशय कठोर परिश्रम घेतले व त्याने महाराष्ट्र डायरेक्टरेट च्या अंतर्गत पुणे ग्रुप मध्ये एकूण सहा कॅम्पमध्ये यशस्वी कामगिरी केली; त्यामुळे त्याची प्रजासत्ताक दिन कॅम्पमध्ये निवड झाली. या सर्व बाबींचा कुर्डूवाडी, भोसरे ग्रामस्थ व महाविद्यालयातील आम्हा सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे.
प्रजासत्ताक दिन कॅम्प नवी दिल्ली यासाठी आमच्या एन.सी.सी. युनिटचे कार्यालय ३८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. हेड ऑफिसचे प्रमुख कर्नल राजेश गजराज, लेफ्टनंट कर्नल वासुदेवन एन, एस. एम. सुहास कांबळे व त्यांच्या सर्व स्टाफ यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
देशातील एकूण १७ एन.सी.सी. डायरेक्टरेटनी आपल्या विविध स्पर्धेत यशस्वी कामगिरी बजावली, पण त्या सर्व डायरेक्टरेट मध्ये महाराष्ट्र डायरेक्टरेट प्रथम क्रमांकाने विजयी झाले आहे त्यामध्ये सोहेल शेख याची कामगिरी अतिशय महत्वाची आहे. महाराष्ट्र डायरेक्टरेटला ट्रॉफी व प्रायमिनिस्टर बॅनर मिळाले, त्याचा आम्हा सर्व महाराष्ट्रीयन जनतेला सार्थ अभिमान आहे.
प्रजासत्ताक दिन कॅम्प नवी दिल्ली येथील सर्व यशस्वी कामगिरीमुळे आमच्या संस्थेचे अध्यक्ष मा. आ. विनायकरावजी पाटील, सचिव बाळासाहेब, भिसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील, ३८ महाराष्ट्र बटालियन चे कर्नल राजेश गजराज, लेफ्टनंट कर्नल वासुदेवन. एन, प्रा. मेजर बी. के. खंडागळे, एन.सी.सी. विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. एस. थोरात, संस्थेतील सर्व मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक व सर्व कर्मचारी वृंद यांनी श्री. सोहेल शेख याचे अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा