जे बोलतो ते करून दाखवतो :-आ.बबनराव शिंदे
आ.बबनराव शिंदे यांची रथात बसवून भिमानगर येथे जंगी मिरवणूक काढण्यात आली.
संजय पाटील भिमानगरकर यांनी आ.बबनराव शिंदे यांची किढली रथात मिरवणूक
टेंभूर्णी प्रतिनिधी:-
भिमानगर हे पर्यटन क्षेत्र होण्यासाठी आमदार संजय मामा शिंदे हे प्रयत्नशील आहेत. एक तर बोलायचे नाही आणि बोलले तर खोटं कधी बोलायचं नाही आम्ही शिंदे बंधू जे बोलतो ते करून दाखवतो .भिमानगर साठी गावठाण वाढीचा प्रस्ताव तयार करून दिल्यास त्यास मंजुरी मिळवून देऊ असे प्रतिपादन आमदार बबनराव शिंदे यांनी केले.
माढा तालुक्यातील भिमानगर येथे आयोजित केलेल्या पाणी पुरवठा व विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार संजयमामा शिंदे होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती .कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती संजय पाटील भिमानगर कर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
आमदार संजय मामा शिंदे म्हणाले की 2014 नंतर माढा तालुक्यातील गावात आ. बबनराव शिंदे आणि मी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकत्र आलो आहे .दोन सख्खे भाऊ विधानसभेत पहिल्यांदाच पाठवण्याची किमया माढा तालुक्यातील जनतेने केली आहे .आम्हाला दिलेल्या ताकतीचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी करणार आहे.
संजय पाटील भिमानगर म्हणले की दादा आम्ही तुमच्या विरोधात बरेच दिवस होतो विरोधात असतानासुद्धा काम करण्याची धमक फक्त आमदार शिंदे मध्येच आहे .आमचे अनेक वर्षे तुमच्या विरोधात जाऊन फुकटात गेली कोरूना काळातही आ. बबनराव शिंदे यांनी लोकांना सोयी उपलब्ध करून दिले आहेत.
आ.बबनराव शिंदे यांची रथात बसवून भिमानगर येथे जंगी मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी सरपंच सोनाली माने , उपसरपंच दिपाली गायकवाड, येताळ जाधव,धनाजी जवळगे, राष्ट्रवादी काँग्रेस माढा विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील,संभाजी पाटील ,चित्रा वाघ ,रमेश पाटील, उजनी तंटामुक्त अध्यक्ष दिलीपराव पाटील,उजनीचे उपसरपंच सतीश पाटील,भरत मस्के ,पांडुरंग घाडगे ,प्रशांत पाटील,राजेंद्र पाटील ,रामभाऊ शिंदे ,पांडुरंग माने ,गणेश पाटील, राजेंद्र ढेकणे, कांतीलाल नवले ,तानाजी सलगर, समाधान वाघमारे ,कैलास नवले ,राम भाऊ नवले ,तानाजी गाडे ,माणिक झिंजे ,हरिदास माने, सौदागर पोळ, सुनिल भानवसे ,वसंत पाटील ,पंढरी चंदनकर ,डॉ .विनोद चव्हाण, नितीन मस्के ,संतोष चव्हाण, अभिजीत मस्के, भिवाजी माने ,प्रमोद कदम, रवींद्र जाधव, रामभाऊ सरवदे,कोंडारभागातील सर्व गावातील सरपंच व उपसरपंच सोसायटीचे चेअरमन आदी उपस्थित होते.
चौकट
रांझणी-भिमानगर या ग्रामपंचायतीने गरिब कुटुंबातील 40 मुलींच्या नावाने सुकन्या योजनेत 190.000 एक लाख नव्वद हजार 14 व्या वित्त आयोगातून भरणारी रांझणी-भिमानगर हि माढा तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे असे मा.कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील भिमानगरकर यांनी सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा