श्री विमलेश्वर विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
बेंबळे प्रतिनिधी
बेंबळे ता.माढा येथील श्री विमलेश्वर विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेच्या संचालिका सौ स्वातीताई पाटील,सौ पूणम जाधव यांनी केले
यावेळी मोहन भोसले यांनी सांगितले की
सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.
सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा बालिकादिन म्हणून साजरा केला जातो.
१८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. सावित्रीबाई फुले यांचे १० मार्च १८९७ रोजी निधन झाले.
संस्थेचे मुख्याध्यापक अशोक बागवाले यांनी विद्यालयाचे विद्यार्थी पोलीस खात्यात भरती झाले बद्दल त्यांचे अभिनंदन केले
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नागेश मस्के, पोलीस कॉन्स्टेबल सागर गोडसे, अविनाश घायतीडक, महेश कांबळे, महेश साडेकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक बबन भोसले यांनी केले
चौकट
यावेळी श्री विमलेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी सागर गोडसे मुंबई पोलीस,महेश कांबळे सांगली पोलीस, अविनाश घायतीडक पुणे एस आर पी पोलीस व महेश साडेकर यांचा संस्थेचे वतीने सन्मान करण्यात आला तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले बद्दल प्रतिक मोहन भोसले या सन्मान करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा