*तुळजापूर तालुक्यातील वडगाव (देव) गावामध्ये कोरोणा लसीकरण शंभर टक्के पूर्ण झाल्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार*
प्रतिनिधी रूपेश डोलारे. उस्मानाबाद.
तुळजापूर तालुक्यातील वडगाव देव गावांमध्ये कोरोणा चे लसीकरण 100% पुर्ण झाल्याबद्दल ग्रामपंचायत च्या वतीने जे काही गावांमधील कोविड योद्धा आहेत त्यांच्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमांमध्ये आरोग्य विभाग व स्वयं शिक्षण प्रयोग तसेच ग्रामपंचायत टीमचा सत्कार करण्यात आला तसेच स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेने लसीकरण पूर्ण करण्यासाठी गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अवरणेस करून आरोग्य विभागाला मदत केल्याबद्दल वडगाव ग्रामपंचायत ने प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या अर्चना कोळी व गावलीडर यांचा सत्कार केला तसेच गावातील सरपंच पद्मिनी बाई सगट आशा वर्कर शामल शिंदे अंगणवाडी कार्यकर्ती रंजना बंडगर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा