*श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, गौडगाव, येथे प्रजासत्ताक दिन साजरा*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गौडगांव ता.बार्शी.जि.सोलापूर या संस्थेचे संस्थापक कै.कर्मवीर लोहोकरे गुरूजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भारतीय प्रजासत्ताक दिन 26
जानेवारी 2022 राष्ट्रीय सन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.कै.कर्मवीर लोहोकरे गुरूजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण श्री.पंडितराव (तात्या) लोहोकरे प्रभारी सचिव यांनी केले.मल्टी पर्पज आदर्श न्यु.इंग्लिश माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय गौडगांव ता.बार्शी.जि.सोलापूर या शाळेतील ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष श्री.विनायकराव गरड (बप्पा) यांनी केला.तसेच संचालक श्री.अरूण भड सर,श्री.अनिल (काका) गरड,श्री.जीवनराव लोहोकरे सर,प्राचार्य श्री.आप्पासाहेब कुतवळ सर,पंचायत ट्रेनिंग सेंटर चे प्राचार्य श्री.रमाकांत गरड सर, आय.टी.आय.चे प्राचार्य श्री.प्रवीण गरड सर व तीन ही विभागाचे कर्मचारी हजर होते.व इंग्लिश स्कूल चे प्राचार्या श्रीम.गरड मॅडम व त्यांचा स्टाफ हजर होता.याचे निमित्त साधत दिनदर्शिकेचे प्रकाशन मा. अध्यक्ष श्री.विनायकराव गरड यांच्या हस्ते केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा