Breaking

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

मल्टी पर्पज आदर्श न्यू इंग्लिश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात,बालिका दिन साजरा*



*मल्टी पर्पज आदर्श न्यू इंग्लिश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात,बालिका दिन साजरा*


आज दिनांक,०३ जानेवारी रोजी क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयती निमित्त मल्टी पर्पज आदर्श न्यु.इंग्लिश माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय गौडगांव ता.बार्शी.जि.सोलापूर या शाळेमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला.प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री.संजय आबासाहेब भड,श्री.जिवराज रमेश गरड सर,प्राध्यापक.संदीप चव्हाण सर,वरिष्ठ लिपिक श्री.संजय सोनवणे सर,सेवक श्री.पोपट देवराव सोनवणे हजर होते.सर्व उपस्थित यांनी  विनम्र अभिवादन केले. त्या प्रसंगी इ.5 वी ची  विद्यार्थीनी तनुजा अभिमन्यू लाटे या विद्यार्थीनींनी प्रतिमापूजन केले,तसेच यावेळी माझी ग्रंथालय प्रमुख श्री अरविंद यादव, शाळेचे सेवक श्री माधव पाटील उपस्थित होते.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा