Breaking

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे ग्रामपंचायतच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा*


*तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे ग्रामपंचायतच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा*



प्रतिनिधी/ रूपेश डोलारे उस्मानाबाद

आज  दिनांक २६/१/२०२२ रोजी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केमवाडीच्या लोकनियुक्त  सरपंच सौ. छाया डोलारे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाप्रमाणे.. झेंडा वंदन हे नियमानुसार गावचे प्रथम नागरिक सरपंच स्वतः करणे क्रमप्राप्त असताना ग्रामपंचायत ने एक वेगळा आदर्श निर्माण केला  आहे.  कोविड  काळात ज्या कोविड योद्धयांनी  जीवाची बाजी लावून गावाची सेवा केली, रात्री अपरात्री लोक बाहेरून आले की त्यांना विलगीकरनात ठेवण्यात कसूर केली नाही. जसे शेतकरी पिकाचे संरक्षण करतात,जवान देशाचे रक्षण करतात तसे चोवीस तास गावचे कोरोना पासून रक्षण करून गाव कोरोना मुक्त ठेवले.त्या उलेखणीय कर्याबदल आशा कार्यकर्ती सौ.आशा सुनील काशीद, अंजना विष्णू ताटे,अंगणवाडी सेविका मालन डोलारे, सरोजा नकाते,उज्वला फंड,मदतनीस माधुरी काशीद ,कुसूम साळुंखे, पोलीस पाटील,ग्रापं. कर्मचारी, नवनाथ यादव,संगणक चालक संदीप काशीद,ग्रामरोजगार सेवक बजरंग कदम यांचे हस्ते झेंडा वंदन करून त्यांचे स्वागत ,सत्कार होणे आद्य कर्तव्य आहे म्हणून  त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. जगामध्ये कोरोनाने कहर केलेला असताना गाव आज ही कोरोनामुक्त आहे. जे विधायक काम करतात त्यांना कायम ग्रामपंचायत नेहमी  मानसन्मान करत आहे.या प्रसंगी उपस्थित सरपंच सौ . छाया डोलारे ,उपसरपंच गौरीशंकर नकाते,ग्रामसेवक एस.ए.कोठे ,प्रदीप माळी राऊत ,निशांत फंड ,राजेंद्र माळी ,राजेंद्र जाधव ,राजेंद्र डोलारे ,केशव पाटील ,अमोल शिंदे,रमेश यादव ,अमोल फंड ,सदानंद काशीद,अनिकेत शिंदे ,कुमार शिंदे ,बालाजी जाधव,मंजूर मुजावर  आदी उपस्थित होते. "आपला सहकारी - लोकनियुक्त सरपंच ग्रा.पं.केमवाडी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा