Breaking

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत ५२२ पात्र लाभार्थी यांना अनुदान मंजूर*.


*संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत ५२२ पात्र लाभार्थी यांना अनुदान मंजूर*.



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद


 आज दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी तहसिल कार्यालय तुळजापूर येथे श्री सौदागर तांदळे, तहसीलदार तुळजापूर व इतर मान्यवरांच्या हस्ते ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमीत्त तुळजापूर तालुक्यातील ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मयत झाली आहे अशा एकुण २८ पात्र लाभार्थी यांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत प्रत्येकी रुपये २०००० / चे धनादेश वाटप करण्यात आले . तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत ५२२ पात्र लाभार्थी यांना मंजूरी देण्यात आलेली असून सदर लाभार्थी यांना माहे जानेवारी २०२२ पासून अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. सदर पात्र लाभार्थी यांनी कोणत्याही एजंट अथवा मध्यस्थ यांच्या प्रलोभणास बळी न पड़ता थेट बँकेतून स्वत : अनुदान उचलण्याची काळजी घ्यावी असे आवाहन तहसिल कार्यालय तुळजापूर मार्फत करण्यात येत आहे. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत लाभार्थी यादी खालील प्रमाणे आहे. 

या कार्यक्रमासाठी तालुक्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व नायब तहसिलदार, अव्वल कारकून, महसूल सहायक आणि तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थीत होते. सदर लाभ मिळवून देण्यासाठी तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभागाचे नायब तहसिलदार श्री महादेव पाटील तसेच श्री बाळासाहेब पवार व श्रीमती वैशाली काळे महसूल सहायक यांनी परिश्रम घेतले. तालुक्यातील अशा प्रकारच्या लाभापासून एखादे कुटुंब वंचित असल्यास त्यांनी सर्व कागदपत्रासह तहसिल कार्यालय तुळजापूर येथे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा