Breaking

शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

माढा तालुक्यात उपळाई चे सरपंच संदीप पाटील यांना मारण्याच्या उद्देशाने केला कामगाराने गोळीबार ?*



*माढा तालुक्यात उपळाई चे सरपंच संदीप पाटील यांना मारण्याच्या उद्देशाने केला कामगाराने गोळीबार*


माढा तालुका प्रतिनिधी- AJ24TAAS News Network*


आज शुक्रवारी माढा येथील उपळाई गावात एका व्यक्तीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे .त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे.


उपळाई (खु)चे सरपंच संदीप पाटील यांच्या घरावर प्रथम दगडफेक झाली. नंतर काही वेळाने गोळीबार झाला. ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. गोळीबार करणारी व्यक्ती ही संबंधित केवड येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचारीचा नातेवाईक आहे. डिझेल चोरी करत असल्याच्या संशयावरून संदीप पाटील यांनी काल त्याला जाब विचारला होता.त्यामुळे सदर वाद पेटला.

 पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की..

संबंधित आरोपी प्रमोद जाधव हा केवड येथील साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर कामगार म्हणून होता. त्याच्यावर डिझेल चोरीचा आरोप घेतला गेल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी उपळाई खुर्दचे सरपंच संदीप पाटील यांच्या घरी गेले असता प्रमोद जाधव व संदीप पाटील यांच्या मध्ये बाचाबाची व शिवीगाळ होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले व संदीप पाटील यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने जाधव यांच्या नातेवाईकानी पिस्तूल रोखली असल्याचे पाटील यांनी त्यात म्हटले आहे.

दरम्यान, गावातील काही मंडळी भांडण सोडवण्यासाठी आली. त्या आलेल्या नागरिकांना देखील काठीने मारहाण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी प्रमोद लक्ष्मण जाधव ,विनोद लक्ष्मण जाधव , सुवर्णा लक्ष्‍मण जाधव, कौशल्य अभिमन्यू जाधव,अभिमन्यू जाधव राहणार शिंदेवाडी व इतर दोन आरोपी आनंद शिवाजी बारबोले ,तनुजा आनंद बारबोले राहणार दारफळ यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा हे करत आहे"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा