*तामलवाडी येथे पत्रकार दिनानिमित्त आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पत्रकारांना सन्मानीत करण्यात आले*
०६ जानेवारी १८३२ रोजी मराठी पत्रकारितेचे जनक दर्पण कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस व दर्पण वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशनाचा दिवस म्हणजे ०६ जानेवारी हा आपण मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा करतो त्यानिमित्त तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी पत्रकार संघाचे निर्भीड पत्रकार ज्यानी आपली भूमिका खंबीरपणे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची निभावली असे ज्येष्ठ पत्रकार श्री अविनाश गायकवाड, श्री दादासाहेब काडगावकर, प्रा. श्री कनीफनाथ माळी सर यांचा शाल, पुष्पहार व समाजभूषण पुरस्कार देऊन आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री सावंत शिवाजी रामकृष्ण, ग्रा.प.सदस्य तामलवाडी श्री सतीश माळी, समाजसेवक श्री शाहीर गायकवाड यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा