Breaking

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

स्वयं शिक्षण प्रयोग उस्मानाबाद यांच्या माध्यमातून महिलांची कार्यशाळा संपन्न, यामध्ये तुळजापूर तालुक्यातील 100 गावातील महिलांनी प्रतिसाद नोंदविला*


*स्वयं शिक्षण प्रयोग उस्मानाबाद यांच्या माध्यमातून महिलांची कार्यशाळा संपन्न, यामध्ये तुळजापूर तालुक्यातील 100 गावातील महिलांनी प्रतिसाद नोंदविला*



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

आज स्वयं शिक्षण प्रयोग उस्मानाबाद यांच्या माध्यमातून महिलांची कार्यशाळा संपन्न झाली यामध्ये तुळजापूर तालुक्यातील 100 गावातील महिलांनी प्रतिसाद नोंदविला स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या तबस्सुम मोमीन यांनी संस्थेची ओळख व संस्थेमध्ये चालणाऱ्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली.या कार्यशाळेमध्ये महिलांना जनावरांचे आरोग्य व व्यवस्थापन तसेच पशुधन व्यवसायत महिलांचे 70 टक्के कार्य असावे हे पशु विभागाचे डॉ खाडे सर यांनी महिलांना पटवून दिले तसेच पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली. तसेच आत्मा विभागाच्या माध्यमातून महिलांना वेगवेगळ्या योजना संदर्भात आत्मा विभागाचे लोंढे सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच जनावरांचे चारा व्यवस्थापन व उत्पादन वाढ याविषयीचे मार्गदर्शन लक्ष्मी डेरीचे डॉ गवळी सर यांनी केले. तसेच ग्रामीण भागातील महिलांना गावात मिनी बँक सुरू करण्यासाठी एअरटेल बँक विषयी मार्गदर्शन रोहित हुडे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्वयं शिक्षण प्रयोग च्या तालुका समन्वयक रोहिणी घोडके, सुकेशनी धनके, अर्चना कोळी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा