Breaking

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

राष्ट्रसंत गाडगे महाराज माणसातील देव शोधणारे व्यक्तीत्व-प्राचार्य डॉ मणेर*


*राष्ट्रसंत गाडगे महाराज माणसातील देव शोधणारे व्यक्तीत्व-प्राचार्य डॉ मणेर*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


तुळजापूर,दि.२३, फेब्रुवारी, *येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले,सदरप्रसंगी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ मणेर म्हणाले की, महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे,संत परंपरेतुन महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण झाली आहे,याच परंपरेत राष्ट्रसंत आणि स्वच्छतेचे अग्रदुत गाडगे महाराज यांचे नाव घेतले जाते,त्यांनी आपल्या मार्मिक आणि ओघवत्या भाषेतुन किर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केले, समाजातील वाईट चालीरिती,वाईट परंपरा यांचा विज्ञानवादी दृष्टीकोनातून   बिमोड करण्याचा प्रयत्न केला, प्रबोधनकार ठाकरे, विठ्ठल वाघ अशा मोठ्या लेखकांनी त्यांच्यावर लेखन केले, त्यांनी धर्मशाळा,गोशाळा निर्माण करुन विश्र्वाला मानव धर्म शिकविला,पशु हत्येला विरोध केला,स्वत: मंदिरात न जाता समाजातील रंजल्या गांजलेल्या लोकांची सेवा केली तसेच युवकांना व्यसनांपासून दूर करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, शेवटी त्यांच्या विचारांची शिदोरी युवकांनी समाज हितासाठी पुढे घेऊन जाण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा व्ही एच चव्हाण,प्रा.ए.बी वसेकर यांनी पुढाकार घेतला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सोहन कांबळे यांनी आणि आभार प्रा.डॉ.बी डब्ल्यू गुंड यांनी मानले.याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा