* एटीएम मशीन चोरणारी टोळी जेरबंद..पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची धडाकेबाज कारवाई*
AJ 24 Taas News साठी इंदापूर प्रतिनिधी - आदित्य बोराटे
मुरटी येथील नीरा-मोरगाव रोडवर असलेल्या TATA INDICASH कंपनीचे एटीएम मशीन दि.१६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेऊन एकूण ४,११,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती.याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाकडून चालु होता. गुन्ह्यामध्ये पांढऱ्या रंगाची बोलेरो चारचाकी वाहनाचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले होते . पोलिसांनी बोलेरो गाडीचा मागोवा घेत रोडवरील CCTV फुटेज तपासण्यास सुरूवात केली, फुटेजच्या आधारावर बोलेरो गाडीची काही ठळक वैशिष्ठ्ये शोधून रस्त्यांवरील CCTV फुटेज चेक करत बोलेरो गाडी ही कारेगाव ता.शिरूर जि. पुणे परिसरात आल्याचे दिसून आले.
तपास पथकाने सूत्रे हालवत, रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पो.नि. मांडगे यांचे मदतीने कारेगाव परिसरात पांढऱ्या रंगाच्या बोलरोचा शोध सुरू केला. त्या दरम्यान तपास पथकाला गुप्त बातमी द्वारा मार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील एटीएम चोरीतील आरोपी बनवारीलाल मीना हा त्याचा मित्र बाबूलाल उर्फ पप्पू चौधरी याचे सोबत गुन्हयातील संशयित बोलेरो गाडीचा वापर करत आहेत.अशी माहिती मिळाल्याने दि.२ फेब्रुवारी रोजी कारेगाव परिसरात सापळा लावला असता ते दोघे बोलेरो वाहनास मिळून आले.त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता, त्यांचा सदर गुन्हयात सहभाग असलेचे निष्पन्न झाले.त्यांनी बोलेरो गाडीचा वापर करून जवळा ता.पारनेर जि. अहमदनगर येथील एटीएम मशीन चोरी केले असल्याचे सांगितले असून बोलेरो गाडीची कागदपत्रे त्यांचे जवळ उपलब्ध नसल्याने गाडीची माहिती घेतली असता तोफखाना पो.स्टे.येथे सदरची बोलेरो गाडी चोरी गेलेबाबत फिर्याद दाखल असल्याचे समजले आहे.
सदर आरोपी यांनी लोणी व्यंकनाथ परिसरात पिकअप गाडीचा वापर करून एटीएम चोरण्याचा प्रयत्न केला असून नगर-मनमाड रोडवरील गरवारे चौक परिसरात देखील पिकअप गाडीचा वापर करून एटीएम मशीन चोरी करण्याचा प्रयत्न केला असून त्यावेळी त्याठिकाणी पिकअप गाडी सोडण्यात आली असल्याचे आरोपींनी सांगितले आहे.
सदर गुन्ह्यामध्ये बनवारीलाल उर्फ राजू मोहनलाल मीना,( वय ३४वर्षे,सध्या रा.कारेगाव ता. शिरूर जि पुणे, मूळ रा.पाचार ता. दातारामगड, जि.सिखर राज्य राजस्थान),बाबूलाल उर्फ पप्पू गोपाळ चौधरी,(वय ३० वर्षे, सध्या रा.कारेगाव रॉयल हॉटेल, ता. शिरूर जि. पुणे, मूळ रा. करड, ता. दातारामगड,जि. सिखर, राज्य राजस्थान),यांच्याकडून एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक मा. मिलिंद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके,सपोनि सचिन काळे,सपोनि संदीप येळे,सहा फौ.तुषार पंधारे,पो.हवा.रविराज कोकरे,पो.हवा.जनार्दन शेळके,
पो.हवा.राजू मोमीन,पो.हवा. अजित भुजबळ,पो.हवा. अभिजीत एकशिंगे,पो.ना.मंगेश थिगळे,पो.ना.स्वप्नील अहिवळे,पो.ना.योगेश नागरगोजे,
यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा