*तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये तुळजापूर तालुक्यातील सांगवी(काटी) या गावातील युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक धनंजय काका पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय सरडे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव जाधव यांच्या प्रयत्नातून, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संघटक व प्रसिद्धीप्रमुख बबन गावडे यांच्या उपस्थितीत सांगवी (काटी )येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी महादेव राजेंद्र मगर, सुरज दादाराव मगर,गणेश मगर,यांनी जाहीर प्रवेश केला,आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी व राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार सर्वसामान्य ग्रामीण भागातील नागरिक जनते पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत असलेल्या कामाबाबत व पवार साहेबांचे विचार आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणार आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले महादेव राजेंद्र मगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यांना पुढील वाटचालीस तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव जाधव यांनी त्यांच्या भव्य सत्कार करून शुभेच्छा दिल्या व तसेच सांगवी काटी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते संजय कबीर बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय तालुका सरचिटणीस पदी गोकुळ तात्या शिंदे यांनी त्यांची निवड केली व पुढील वाटचालीस त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा