*तुळजाई नगरीत आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या जन्मदिनी महाआरतीसह रक्तदान शिबीर, मिठाई व अन्नदान वाटप*
*गुलचंद भाऊ व्यवहारे यांच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे नियोजनबद्ध आयोजन*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर - भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर शहरात
गुलचंद भाऊ व्यवहारे यांच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे नियोजनबद्ध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, आई तुळजाभवानी मातेला महाआरती करुन साहेबांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी साकडे घालण्यात आले,यावेळी पंचावन्न भाविकांच्या व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली.
आई तुळजा भवानी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अकराशे नारळ पुणे येथील साहेबांच्या कार्यकर्त्यांच्या वाटप करण्यात आले तसेच महाद्वारासमोर 55 किलो मिठाईचे वाटप नागेश नाईक, इंद्रजीत साळुंके, प्रसाद पानपुढे यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी भाविकांना मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले.
शहरातील विठ्ठल मंदिर आर्य चौक येथे 60 रक्तदात्यांनी रक्तदान उत्स्फूर्तपणे केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस विकासराव कुलकर्णी, नागेश नाईक जिल्हा कोषाध्यक्ष,प्रदेश कार्यकारिणी सदस्य एडवोकेट खंडेराव चौरे,भारतीय पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य मीनाताई सोमाजी, जिल्हा चिटणीस सुहास साळुंखे, महेंद्र कावरे,प्रा. प्रशांत भागवत यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पुणे येथील साहेबांचे समर्थक रोजी बुवा तसेच अनुसूचित जाती मोर्चा चिटणीस कोमलताई शिंदे, रमेश शिंदे, उद्योग आघाडीचे जिल्हा संयोजक सुशांत भूमकर, कल्याण सागर समूहाच्या सचिव प्रज्ञाताई कुलकर्णी, जिल्हा चिटणीस युवती स्वातीताई शिंदे, रूपालीताई घाडगे, शितल कुलकर्णी, प्रभावती मार्डीकर सुलोचनाताई वेदपाठक महिला मोर्चा उमरगा तालुका अध्यक्ष,
शिवाजी बोधले, बाबा श्रीनामे, पद्मराज गडदे,
युवा स्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे यांची विशेष उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुलचंद व्यवहारे, महेंद्र कावरे, मीनाताई सोमाजी,आनंद कंदले, सागर पारडे, विकास मलबा, इंद्रजीत साळुंके, प्रसाद पानपुडे,सचिन अमृतराव, गिरीश जवळकर, बाळासाहेब भोसले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे दयानंद शिंदे, सार्थक कदम, तसेच आमदार सुजित सिंग ठाकूर साहेब यांच्या वर प्रेम करणारे विविध ठिकाणाहून आलेले कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा