शिवजयंती उत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्था कामी पुसेगाव पोलिसांचे रूट मार्च
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
१९ फेब्रुवारी रोजी शनिवारी शिवजयंती साजरी होत असून गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर या वर्षीच्या शिवजयंती उत्सवासाठी शासनाकडून कोरोना महामारीच्या निर्बंधावर शिथीलता केली असून यावर्षी शिवजयंती उत्सव साजरा करण्याकरिता प्रशासनाच्या दिलेल्या नियमावलीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवजयंती उत्सव साजरा करण्याकरता तरुणांमध्ये व नागरिक, ग्रामस्थ यांच्यामध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
गावोगावी शिवजयंती उत्सवानिमित्त अनेक ठिकाणी सजावट व रोषणाई करण्यात आलेली आहे. तर अनेक चौकाचौकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर व आकर्षक असे कटआउट लावण्यात आलेले आहेत. दोन वर्षांच्या कालावधीनंतर शिवजयंती साजरी होत असल्याने तरुणाई मोठ्या प्रमाणात उत्साहात आहे. शिवजयंती उत्सव साजरा करीत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकामी पुसेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातून रूट मार्च काढण्यात आला. रूटमार्च करिता कोरेगाव विभागाचे डीवायएसपी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, उपसहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब लोंढेपाटील, विभागातील ६ अधिकारी, ३५ अंमलदार, ५ वाहने, १अंबुलन्स या रूट मार्चमध्ये भाग घेतला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा