*तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभिकरण करणे च्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता,नगराधक्ष सचिन (भैय्या) रोचकरी यांची पत्रकार परिषदेत माहिती,*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
वरील संदर्भाने डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा तथा चौक सुशोभिकरण संदर्भाने दि 30 मार्च 2021 रोजी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता त्यानुसार तुळजापूर विकास प्राधिकरण बैठक दिनांक 26 जुलै 2021 रोजी सुधारित प्रशासकीय मान्यता आदेश मूळ किमतीपेक्षा तीस टक्क्यांनी वाढ होत असल्याने त्यास शासनाची मान्यता घेणे बाबत निर्णय घेण्यात येऊन नऊ ऑगस्ट 2021 रोजी माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष तुळजापूर विकास प्राधिकरण उस्मानाबाद यांच्यामार्फत माननीय प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला त्यानुसार सदरच्या मान्यतेबाबत माननीय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सदरच्या प्रस्तावास दिनांक 28 डिसेंबर 2021 मान्यता घेतली आहे त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभीकरणाच्या कामास आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून सुधारित मान्यतेचे आदेश प्राप्त होतात निविदा प्रक्रिया राबवून चौक सुशोभिकरण करणे व त्याचबरोबर पूर्णाकृती पुतळ्याच्या कामास लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे वरील पुर्णाकृतु पुतळ्या संदर्भाने ६ डिसेंबर महिपरीनिर्वान दिवस डाँ बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाना दिवशी आमदार राणादादा तथा नगराध्यक्ष सचिन रोचकरी,विनोद (पिटु) गंगणे यांच्या कडे नगरविकास मंत्रालया कडुन अंतिम मंजुरी आणण्याबाबत समाज बांधवां समक्ष नगरसेवक औदुंबर कदम यांनी मागणी केली होती. तसेच वरील डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या संदर्भाने नगरसेवक किशोर साठे व RPI नेते तानाजी कदम आदींनी पाठपुरावा केलेला आहे. चौक सुशिभिकरण करणे अंदाज पत्रकीय किंमत ८७.३१ लाख,डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा बसवणे निविदा रक्कम १२ लाख असे एकुण ९९.३१ लाख म्हजेच एक कोटी रुपये अंदाजित खर्च आपेक्षीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा