Breaking

रविवार, १३ मार्च, २०२२

रणजितसिंह शिंदे यांची सोलापूर जिल्हा दुध संघाच्या चेअरमनपदी निवड झालेबद्दल कन्हेरगांव ग्रामस्थांतर्फे सत्कार



रणजितसिंह शिंदे यांची सोलापूर जिल्हा दुध संघाच्या चेअरमनपदी निवड झालेबद्दल कन्हेरगांव ग्रामस्थांतर्फे सत्कार    


                    
कन्हेरगांव :- सोलापूर जिल्हा सहकारी दुध  संघाच्या चेअरमनपदी रणजितसिंह शिंदे यांची निवड झाल्याबद्दल कन्हेरगांव ग्रामस्थांतर्फे वि का सेवा सोसायटीचे सचिव देविदास डोके व प्रा.हनुमंत पाटिल यांचेहस्ते सत्कार करण्यात आला.
         यावेळी कन्हेरगांव ग्रामस्थांच्या विविध अडचणी संदर्भात चर्चा करुन त्या मार्गी लावण्याची ग्वाही नुतन चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी दिली. यावेळी अकोलेचे जेष्ठ नेते नानासाहेब नवले,हरितक्रांती पाणिपुरवठा संस्था कन्हेरगांवचे व्हाईस चेअरमन पोपट केदार,संचालक नवनाथ मोरे,वि.का.स.सेवा सोसायटीचे चेअरमन नागेश मोरे,संचालक रामलिंग खोचरे,अतुल डोके,युवा उद्योजक योगेश खोचरे,उमेश डोके,पोपट मोरे सर,शेतकरी संघटनेचे संजय डोके,ग्रा.प.सदस्य      
सोमनाथ लोखंडे,कुमार डोके,नागेश माने,बाळासाहेब शिंदे,रतिलाल केदार,किरण खोचरे,धनंजय माने,शहाजी लोखंडे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा