Breaking

बुधवार, ९ मार्च, २०२२

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा*



*यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा*



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


तुळजापूर:- येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयात माँ साहेब जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास (दादा) बोरगावकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. पुष्पहार ,पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महाविद्यालयातील महिला प्राध्यापक ,शिक्षक यांना बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास (दादा) बोरगावकर  साहेबांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या वेळी प्र.प्राचार्य डॉ. अनिल शित्रे, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव,कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे,राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. शशिकला भालकरे,डॉ. बृहस्पती वाघमारे, प्रा. अनिल पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शिवाजी जेटीथोर यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले, या प्रसंगी प्रा. प्रमोद मुळे,डॉ.महादेव देशमुख,प्रा.आर. जे. बोपलकर,डॉ. प्रवीण भाले, डॉ. मंदार गायकवाड,प्रा. जी. व्ही. पाटील,प्रा. सौ.सुमित्रा कोरेकर ,डॉ. सुलभा कदम ,प्रा.चंद्रकला काठेवाड, प्रा. उषा बदने, प्रा.आर.पी. गायकवाड,प्रा.राजू खिल्लारे,प्रा.एस. आर.राठोड,श्री.पांडुरंग नागणे, डॉ. सतीश महामुनी यांची कार्यक्रमास उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीते साठी प्रा. अमोद जोशी, कृष्णा कोळी, महादेव जाधव ,राजू बनसोडे,यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा