Breaking

रविवार, १३ मार्च, २०२२

झिंजेवस्ती ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेतकरी ग्रामीण विकास आघाडीच्या मैनाताई अंकुश मदने यांची बिनविरोध निवड


झिंजेवस्ती ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेतकरी ग्रामीण विकास आघाडीच्या मैनाताई अंकुश मदने यांची बिनविरोध निवड    


प्रमोद भैस       
       पिलीव प्रतिनिधी - माळशिरस तालुक्यातील झिंजेवस्ती ग्रामपंचायतीच्या प्रकाश पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असणाऱ्या उपसरपंच पदासाठी आज ग्रामपंचायत सदस्यांनची ग्रामपंचायत कार्यालयात    सरपंच उमा जावळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसरपंच पदासाठी सत्ताधारी शेतकरी ग्रामीण विकास आघाडीच्या मैनाताई अंकुश मदने यांचा एकमेव अर्ज उपसरपंच पदासाठी आला त्यामुळे त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. यावेळी सरपंच उमा जावळे, प्रकाश पाटील, शिला मेटकरी, जब्बार मुलाणी हे सत्ताधारी गटाचे सदस्य उपस्थितीत होते. तर विरोधी गटाचे सर्व सदस्य यावेळी अनुउपस्तिथीत राहीले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी मुंडफणे यांनी काम पाहिले तर सहहयाक म्हणून ग्रामसेवीका बुगड मँडम यांनी काम पाहीले. या उपसरपंच निवडीवेळी माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय जावळे,शयामतात्या मदने, नजीर मुलाणी,बाबुराव पाटील ,केशव मदने , राहुल जावळे,सचिन पुकळे, जितेंद्र पाटील, एकनाथ माळी,लहु पाटील, राजाभाऊ मदने, सुनिल मदने, विजय मदने, रघुनाथ वाघमारे, हरी ढोणे ,डॉ समाधान मदने ,प्रताप मदने ,यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर नुतन उपसरपंच मैनाताई मदने यांचा सरपंच उमादेवी जावळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवडीनंतर फटाके फोडून व गुलालाची उधळण करीत कार्यकत्यांनी जल्लोष केला.     फोटो - झिंजेवस्ती ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मैनाताई मदने यांची बिनविरोध निवड झाली यावेळी सरपंच उमादेवी जावळे ,शयामतात्या मदने ,बाबुराव पाटील ,राहुल जावळे व इतर ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा