Breaking

रविवार, १३ मार्च, २०२२

उमरा येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा


उमरा येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

लोहा : उमरा ता.लोहा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने युगनायक होते.जगाच्या इतिहासात स्वतःच्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवून स्वराज्यातून सुराज्य निर्माण करणारे महापराक्रमी शीलवान बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज हे असे युगनायक होऊन गेले की,त्यांच्या जन्माला आज 391 वर्षे झाली तरीही त्यांचे कार्य पराक्रम आणि विचार त्यांची प्रेरणा अजूनही जिवंत आहे या थोर राजाची जयंती १२ मार्च रोजी उमरा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी गावातील ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक दादाराव शिंदे व सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी गोविंदराव पाटील सिरसाट यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले.सतेच दिवसभर शिवजन्मोत्सव समितीच्या आयोजनातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.सायंकाळी ७ वाजता शिव व्याख्याते धनराज पाटील बाभळीकर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यांनी आपल्या व्याख्याणातून छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर शिवकालीन स्वराज्य आणि संस्कार या विषयी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मा.तेजेराव पाटील सिरसाट मा.गोविंदराव सिरसाट,नागोराव पाटील सिरसाट संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार मा. बालाजी पाटील सिरसाट,सचिन पाटील सिरसाट,पोलीस पाटील आनंदराव सिरसाट,अविनाश पाटील सिरसाट,दाजीराव सिरसाट,सुरेश खोसडे,गोविंद सिरसाट,आनंदा वाघमारे, सुरेश पट्टेकर,धर्मा सोनटक्के,संभाजी ब्रिगेडचे तालुका सचिव पवन सिरसाट मारुती सिरसाट,रामेश्वर सिरसाट सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विजय पांचाळ,सुदर्शन वडजे उपाध्यक्ष श्रीनिवास सिरसाट,सचिव सुरेश सिरसाट,तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे गोविंद सिरसाट,अंगद वडजे,बालाजी सिरसाट,स्वप्नील सिरसाट,अभिजित सिरसाट, शहाजी सिरसाट,मारोती वडजे,हणमंत ढगे,माधव सिरसाट,बालाजी शिंदे,मारोती मोरे यांच्या सह शकडो शिव भक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांना  अभिवादन करून विविध कार्यक्रम सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा