प्राचार्य डॉ रवींद्र बेंदगुडे यांची पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी निवड
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्षपदी श्री. गणपती फार्मसी महाविद्यालयाचे सचिव डॉ रवींद्र बेंदगुडे यांची एक मताने निवड करण्यात आली आहे. त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज ओळखून टेंभुर्णी - करमाळा रोडवर टेंभुर्णी पासून चार किलोमीटर अंतरावर श्री गणपती फार्मसी कॉलेजची स्थापना केली. त्यांचे सामाजिक कार्य लक्षात घेवून ही निवड सर्व पदाधिकारी यांच्या अनुमतीने करण्यात आली आहे. त्यावेळी डॉ रवींद्र बेंदगुडे म्हणाले की तुम्ही केलेली ही निवड मी माझ्या पदाची एकनिष्ठ राहून असोसिएशनचे सर्व नियम पाळून माझी कार्य व संघटनेने दिलेले कार्य जबाबदारीने पार पाडेन. यापुढे पदाची संबंधित सर्व जबाबदारी निष्ठेने पार पाडून महाराष्ट्राच्या सर्व तळागाळातील विद्यार्थी व फार्मासिस्ट पर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करेन. विद्यार्थ्यांचे व फार्मासिस्टचे प्रश्न सोडविण्यासाठी व संघटनेचे वेगवेगळे उपक्रम राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शशी सिंह, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे, प्रदेश सचिव रोहित वाघ व महाराष्ट्र राज्याचे प्रभारी प्रदीप शुक्ला यांनी बंदगुडे यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले. विदर्भ अध्यक्ष ज्ञानेश्वर पायगन व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ता खराटे यांनी निवडीचे पत्र दिले, तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष अनिल सरडे व जिल्हा उपाध्यक्ष शिवराज ढगे यांनी पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा