*तुळजापूर तालुक्यातील प्रहार संघटनेच्या विविध मागण्यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांना निवेदन*
प्रहार संघटनेच्या विविध मागण्यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर तालुक्यातील आत्तापर्यंत ग्रामपंचायत मधील पाच टक्के निधी खर्च करण्यात आलेला नसून, ग्रामपंचायतीमधील अपंग व्यक्तीचा निधी खर्च केलेला नाही,तरी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये अपंग व्यक्तींना येणारा निधी तात्काळ खर्च करण्यात यावा, स्वातंत्र्य घरकुल योजनेचा लाभ द्यावा, समाज कल्याण विभाग व पंचायत समिती विभागामार्फत ज्या योजना दिल्या त्या योजनेसाठी लागणारी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्या शिफारशीची आट रद्द करण्यात यावी, तसेच दिव्यांगांना ग्रामपंचायत हद्दीत खुली जागा किंवा गाळे वाटप करण्यात यावे, तुळजापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दिव्यांगांचे नोंदणीकृत रजिस्टर ठेवावे, व एक प्रिंट काढून प्रहार संघटनेकडे द्यावी तसेच दिव्यांग संघटनेचा प्रतिनिधी ग्रामपंचायत मधील समिती कमिटीमध्ये प्रतिनिधी म्हणून नेमणूक करून घ्यावा,अशा विविध मागणीसाठी आज दिनांक २१ मार्च २०२२ रोजी निवेदन देण्यात आले आहे, तसेच वरील मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, या निवेदनावर तालुकाध्यक्ष शशिकांत मुळे,महादेव चोपदार, महेश माळी, मुकेश जाधव, नागेश कुलकर्णी, मारुती पाटील, गुलाम फकीर, विलास कोठे, महादेव सोनवणे, यांच्यासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा