Breaking

रविवार, १३ मार्च, २०२२

*श्री गणपती फार्मसी मध्ये जागतिक महिला दिन साजरा*



*श्री गणपती फार्मसी मध्ये जागतिक महिला दिन साजरा*


टेंभुर्णी (प्रतिनिधी):अकोले खुर्द ता.माढा येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
       कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या प्रमोदिनी लांडगे (सामाजिक कार्यकर्त्या, समाजबंध संवादक, दक्षता समिती सदस्य, अंधश्रद्धा निर्मुलन समिती संवादक), सविता जगताप तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वतीपूजन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
      सौ.सविता जगताप यांनी आपल्या मनोगता मधुन महिला सक्षमीकरण ही काळाची गरज आहे हे पटवून दिले. प्रमुख पाहुण्या प्रमोदिनी लांडगे यांनी आपल्या मनोगतात महिलांचे यशस्वी जीवनातील योगदान व महत्व विषद करून फार्मसी क्षेत्रात महिलांना रोजगारांच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे सांगितले. तसेच विद्यार्थिनींना लैंगिक शोषणाची माहिती दिली व वेळ प्रसंगी मदतीचे आश्वासन दिले. या निमित्त महाविदयालयातील महिला शिक्षकांचा वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी ईश्वरी राऊत यांनी आपले विचार व्यक्त केले.
   महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षतेसाठी महाविद्यालयात स्थापन केलेल्या लैंगिक शोषण व अँटी रॅगिंग समित्यांची माहिती दिली. या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.आर.डी. बेंदगुडे,अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे तसेच प्रा. रोहिणी गुटाळ ,प्रा.केतकी पाटील , प्रा.मोनिका माळी, प्रा. दिव्या ओस्तवाल, प्रा.रूपाली राऊत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कोमल यादव  यांनी केले तर आभार महाविद्यालयाच्या प्रा.स्वाती पाटील यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा