भाजपाचे कमळ फुलले.
चार राज्यातील विजयोत्सव उस्मानाबादेत साजरा.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
उस्मानाबाद:- देशातील चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलले आणि मतदारांनी भाजपाला सत्ता दिल्याचा आनंदोत्सव उस्मानाबाद भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरा करण्यात आला.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करून नागरिकांना पेढ्याचे वाटप करण्यात आले.
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर म्हणाले की,चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेले भरघोस यश हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकुशलतेची पावती आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरा केलेल्या आनंदोत्सवामध्ये
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, सतिश दंडनाईक,भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर,राजकुमार पाटील,समन्वयक अभय इंगळे, बाजार समिती सभापती दत्ता देशमुख, पंचायत समिती उप सभापती प्रदीप शिंदे,शहराध्यक्ष राहुल काकडे, नगरसेवक प्रवीण पाठक,इंद्रजीत देवकते,भारत डोलारे, विक्रम देशमुख,दयानंद मुडके,रोहित पाटील, बालाजी गावडे,देवा नायकल,पंडीत मंजुळे, पांडूरंग लाटे,लक्ष्मण माने,पुजा देडे,विद्या माने,अमोल पेठे,दाजीप्पा पवार,वैभव हंचाटे,राहुल शिंदे,ओम नाईकवाडी,श्रीराम मुंबरे,विनोद निंबाळकर,राज निकम,कुलदीपसिंह भोसले, गिरीष पानसरे,बालाजी जाधव, सतिश कदम,संदीप इंगळे, प्रसाद मुंडे,सचिन लोंढे,अतुल चव्हाण, सुनिल पंगुडवाले, गणेश येडके,हिम्मत भोसले, विट्ठल गायकवाड,कुनाल व्हटकर, सार्थक पाटील, ज्ञानेश्वर सुळ,रोहित देशमुख, महेश लांडगे,नृसिंह लोमटे, यांचेसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा