Breaking

शनिवार, ३० एप्रिल, २०२२

चिखली येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी बिनविरोध .



चिखली येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी बिनविरोध .



मोहोळ  प्रतिनिधी - चिखली विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली असल्याची माहिती सहाय्यक निबंधक विद्याधर माने यांनी दिली . संस्थेच्या १३ जागांसाठी अनेकांनी अर्ज दाखल केले होते . परंतु निवडणूक  बिनविरोध करण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांनी मतदारांनी  एकत्रित येत हा निर्णय घेतला व सर्व  जागा बिनविरोध बिनविरोध करत संस्थेची परंपरा जपल्याचे सांगण्यात आले  . 



विशेष म्हणजे - चिखली विकास सेवा सोसायटीच्या एकूण १३ जागांपैकी १२ जागा बिनविरोध निवडून आल्या असून १ जागा रिक्त राहिली आहे . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून - एफ जे नाईकवाडी यांनी काम पाहिले . चिखली विकास सोसायटीच्या आत्तापर्यंत सर्व निवडणूका बिनविरोध होत असल्याने अन्य ठिकाणच्या संस्थांसाठी हा आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे एवढेच नव्हे तर  नवनिर्वाचित कार्यकारणी मध्ये जेष्ठ्यांबरोबर नवतरूणांना ही सहभागी करून घेण्यात आले आहे . तसेच विकास सोसायटीचे आजी माजी यांनी विशेष प्रयत्न करत निवडणूक पार पाडली आहे . 

नवनिर्वाचित संचालक 

पप्पू हिरा मते . राजेंद्र बिटू मते . अरुण ज्ञानदेव यादव . विष्णू हरिदास यादव ‌ . दत्तात्रय ज्ञानदेव  यादव . कविता दत्तात्रय  यादव . सोनाबाई भागवत मेंढे . श्रीकांत पांडुरंग पाटील . महादेव पांडुरंग यादव . बजीरंग रामा शिंदे . नामदेव भिका सिरसट .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा