खरीप हंगाम 2022पूर्व नियोजन आढावा बैठक...
*श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघातील कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारे खाते व बी-बियाणे याची टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता कृषी विभाग व कृषी निविष्ठा विक्रेते यांनी घ्यावी - आमदार बबनराव पाचपुते*
श्रीगोंदा-नितीन रोही,
सविस्तर असे की दिनांक 29/4/2022 रोजी मौजे काष्टी येथे माननीय आमदार बबनराव पाचपुते साहेब यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्वनियोजन आढावा सभा पार पडली. या सभेसाठी माननीय उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत श्री अनिल गवळी, तहसीलदार श्री मिलिंद कुलथे, तालुका कृषी अधिकारी श्री दिपक सुपेकर, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी श्री वसंत जामदार, पंचायत समितीचे कृषी अधिकारी डॉक्टर राम जगताप व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे सर्व कृषी अधिकारी व कर्मचारी तसेच तालुक्यातील निविष्ठा विक्रेते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री दिपक सुपेकर यांनी मागील हंगामात कृषी विभागाने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला, तसेच या वर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना सोयीस्कर जावा यासाठी तालुक्याचे नियोजन चित्रफित द्वारे सादरीकरण केले. तसेच शेतकऱ्यांना खते व बियाणे यांचा वेळत व नियोजनबद्ध पुरवठा होणे साठी तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापना केले बाबत सांगितले. त्यानंतर तहसीलदार श्रीगोंदा श्री मिलिंद कुलथे यांनी खते बियाणे औषधे यांचे वाटपाचे नियोजनाबाबत कृषी विभागाचे कौतुक केले. माननीय उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत श्री अनिल गवळी साहेब यांनी खरीप हंगाम 2022 गाव स्तरावरून सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन केले असल्याने, या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये बी-बियाणे खते औषधे पुरवठा बाबत कोणतीही अडचण येणार नसल्याचे सांगितले. तालुका कृषि निविष्ठा पुरवठा यांचे श्री सुनिल ढवळे यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना वेळेत निविष्ठा व दर्जेदार सेवा देणेबाबत ग्वाही दिली. माननीय आमदार बबनराव पाचपुते साहेब यांनी कृषी विभागाच्या कामाचे कौतुक केले, तसेच कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे बाबत अपेक्षा व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून तंत्रशुद्ध पद्धतीने बाजाराचा अंदाज घेऊन उत्पन्न दुप्पट करणे गरजेचे असल्याचे सांगितले. येत्या खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस पडून रोगराई व किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी पुढील खरीप हंगामाच्या दृष्टीने शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीगोंदा पंचायत समितीचे कृषी अधिकारी डॉक्टर राम जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन विस्ताराधिकारी श्री बनकर साहेब यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर आमदार बबनराव पाचपुते दादा यांच्या शुभहस्ते कृषी विभागाच्या महाडीबीटी योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, पावर टिलर व कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने श्री बारकू सोपान रणपिसे, श्री मोतीराम रामचंद्र जंगले, श्री दत्तात्रय बापूराव राहिंज, श्री ईश्वर शहाजी माने आदींना साहित्य वाटप केले. यावेळी बैठकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य व परिक्रमा शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रतिभा ताई पाचपुते, श्रीगोंदा कारखान्याचे संचालक श्री सावता शेठ हिरवे, प्रगतशील शेतकरी श्री मारुतराव औटी, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाचपुते, चेअरमन श्री बबनराव राहिंज, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन वैभव दादा पाचपुते, माजी चेअरमन श्री बाळासाहेब दांगट, रायगव्हाण चे माजी सरपंच मोहनराव हार्डे, माजी सरपंच सुदामराव नलावडे, उत्तमराव परकाळे, अण्णासाहेब शेलार, उद्योजक श्री विक्रम पाचपुते, श्री कुलदीप देशपांडे आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
फोटो,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा