महावितरणच्या अधिकाऱ्यास मारहाण - शेतकऱ्याची निर्दोष मुक्तता .
मोहोळ प्रतिनिधी - दिनांक ११ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास सातपुते वस्ती पाटकुल ता . मोहोळ येथे एम . एस . ई. बी . डीपी वरील एल टी - एच टी लाईनची पाहणी करीत असताना विवेक आकेन . शाखाधिकारी पेनूर यांना मारहाण. शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून सज्जन मोहोन सातपुते रा . पाटकुल ता . मोहोळ यांची सोलापूर सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली .
महावितरणच्या गैरकारभारामुळे आरोपीचा ऊस जळाल्याने आरोपीने महावितरण विरूद्ध तक्रार केलेली होती . सदर तक्रारीला शह देण्यासाठी आरोपींविरुद्ध खोटा खटला दाखल केलेला आहे . विलंबाने दिलेल्या फिर्यादीवरून विश्वास ठेवणे धोक्याचे आहे असा युक्तिवाद आरोपीतर्फे अॅड . धनंजय माने यांनी न्यायालयात केला . याप्रकरणी आरोपीतर्फे अॅड. धनंजय माने . अॅड . विकास मोटे . अॅड . रियाज शेख ( मोहोळ ) यांनी काम पाहिले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा