Breaking

शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

शिवसेनेचे पोलीस व तहसीलदार यांना निवेदन...



शिवसेनेचे पोलीस व तहसीलदार यांना निवेदन...


श्रीगोंदा-नितीन रोही,

सविस्तर असे की महाराष्ट्र राज्या चे मृद व जलसंधारण मंत्री-शंकरराव गडाख  व त्यांचे पुत्र उदयन गडाख यांच्या हत्येचे केंद्र कारस्थान रचणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत श्रीगोंदा शिवसेना व युवासेना यांच्या वतीने श्रीगोंदा तहसीलदार व पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आले.

उपरोक्त विषयान्वये सध्या समाज माध्यमांवर नामदार गडाख साहेबांबाबत काही ऑडिओ क्लिप प्रसारित झालेल्या असून त्यामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्हा तसेच महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये संबंधीत आरोपीने इस्त्रायली बनावटीचे २१ पिस्टल अवैधरीत्या मिळवलेली असून मा.मंत्री व त्यांचे पुत्र यांना जीवानिशी मारून टाकण्याची भाषा केलेली आहे. 

सरकारमधील एका कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याना अशा प्रकारे धमकी देऊन संपवण्याची भाषा करणे हे लोकशाहीला अनुरूप नाही. या ऑडिओ क्लिप मुळे राजकीय नेते, पदाधिकारी, पोलीस व सर्वसामान्य जनता यांच्यात घबराट व दहशत निर्माण झालेली आहे.

नामदार गडाख  व त्यांच्या पुत्राची जिवानीशी हत्या करण्याचे कट कारस्थान रचल्याचा उद्देश संपूर्ण ऑडिओ क्लिप मधून स्पष्ट होत आहे. तरी, वरील सर्व बाबींचा विचार करता सदर आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम व कायद्यातील इतर तरतुदी प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करावा. तसेच सदर आरोपींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे निवेदन श्रीगोंदा शिवसेना व युवासेना यांच्या वतीने श्रीगोंदा तहसीलदार व पोलीस निरीक्षक साहेबांना देण्यात आले.

सदर निवेदन  शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे, तालुका संघटक सुरेश देशमुख, जेष्ठ शिवसैनिक हरिभाऊ काळे,
तालुका उपप्रमुख निलेश साळुंके, युवासेना तालुका प्रमुख निलेश गोरे, अनिल दळवी,ओमकार शिंदे, श्रीराम म्हस्के, अनिल सुपेकर, रोहन मोरे, चंद्रकांत धोरें, राहुल नवले, अतुल दरेकर यांच्या सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


फोटो,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा