*तुळजापूर खुर्द येथील तुळजाभवानी मंदिराच्या कळसारोहनच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी तुळजापूर खुर्द येथील माहेरवाशिणी (लेकींच्या) हस्ते कलशासह जलयात्रा*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
आज तुळजापूर खुर्द येथील तुळजाभवानी मंदिराच्या कळसारोहनच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी तुळजापूर खुर्द येथील माहेरवाशिणी (लेकींच्या) हस्ते कलशासह जलयात्रा तुळजापूर शहरातून उंट, घोडे, भजनी मंडळ, आराधी मंडळ, धनगर ढोल मंडळ, वारूवाले, रथा मध्ये कळस ठेवून पापनाश नगर येथून सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भवानी रोड महाद्वार, आर्य चौक, कमान वेस मार्गे तुळजापूर(खुर्द) येथे कळस मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तुळजापूर(खुर्द)येथील नागरिक,महिलां, अबाल वृद्ध व युवक,बालक यांच्या उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा