मोहोळच्या नागनाथ महाराज यात्रेला शनिवार पासून प्रारंभ .
➡️ विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन .
मोहोळ प्रतिनिधी - मोहोळचे ग्रामदैवत श्री नागनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त ३० एप्रिल ते १९ मे या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी दिली आहे .
-----------------------------------------------
कार्यक्रमांची मेजवानी
यात्रा कालावधीत सोंगी भारूड . ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता शिवलीला पाटील यांचे समाज प्रबोधन किर्तन . ७ मे रोजी बालकलाकार पृथ्वीराज माळी यांचा पोवाड्याचा तर ८ मे रोजी रात्री ९:३० वाजता लावण्यखणी हे कला व सांस्कृतिक कार्यक्रम श्री नागनाथ मंदिर परिसरात होणार आहेत .
---------------------------------------------
शनिवार दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी श्रींस तेल लावण्याच्या कार्यक्रमाने यात्रेच्या धार्मिक विधीची सुरूवात होणार आहे . रविवार १ मे रोजी रात्री वसंत पुजा . गाभाऱ्यातील आरती . व विनायक बुवा शंकर बुवा मोहोळकर यांचे प्रवचन . मंगळवार ३ मे रोजी रात्री एक वाजता वडवळ हुन श्रींच्या छत्रीचे आगमन . पहाटे चार वाजता श्रींची खर्गासह पालखीची सवाद्य मिरवणूक . मुख्य दरवाजावर भाकणूक . खुर्गतिर्थ येथे गुरू शिष्य भेटीचा सोहळा होणार आहे . बुधवार दिनांक ४ मे रोजी वसंत पुजा चंदन उटी . प्रसाद . भजन . शुक्रवार दिनांक ६ मे रोजी रात्री श्रींची सवाद्य मिरवणूक . श्री भिकलिंग महाराज यांची गुरू - शिष्य भेट सोहळा . रात्री शोभेचे दारू काम . शनिवार दिनांक ७ मे रोजी चार वाजता गणाचा कार्यक्रम . पालखी मिरवणूक . भाकणूक . तसेच धनगरी ओव्या . संगीत भजन . रविवारी ८ मे रोजी सकाळी कलगीतुरा . दुपारी चार वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान . सायंकाळी सहा वाजता श्रींच्या छत्रीचे वडवळला प्रयाण होणार आहे . ११ मे रोजी सकाळी श्रींच्या उतरवण्यांच्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे . या वेळी उपाध्यक्ष नारायण काळे . राजेंद्र कुर्डे . विश्वस्त सुरेश घोंगडे . अशोक गायकवाड . सुर्यकांत कांचन . दिलीप देशपांडे . गोविंद घागरे . वसंत काकडे . अभिनंदन गुमते . बाळासाहेब शिंदे . रामचंद्र परीट . सयाजीराव देशमुख . विष्णू गायकवाड . सतीश गरड . राजाभाऊ कुर्डे . अॅडव्होकेट हिंदूराव देशमुख . ओंकार देशमुख . उल्हास वाले . प्रशांत गायकवाड . विजयकुमार स्वामी . धनंजय कारजकर आदी उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा