Breaking

शनिवार, १६ एप्रिल, २०२२

गणपती फार्मसी महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी



गणपती फार्मसी महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी


मौजे अकोले खुर्द तालुका माढा येथील श्री गणपती औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निम्मित औषधी वृक्षांचे वृक्षारोपण व त्यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. बबनरावजी शिंदे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र ठोंबरे सर तसेच कन्हेरगावचे माजी उपसरपंच श्री धनंजय मोरे ,ॲड. महादेव कदम यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात केली. 

या वेळी श्री राजेंद्र ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास व भारतीय राज्यघटनेतील त्यांचा मोलाचा वाटा या वर मार्गदर्शन केले. 
ॲड. महादेव कदम यांनी बाबासाहेबानी तयार केलेल्या घटनेतील विविध कायदे व मूलभूत हक्क विद्यार्थ्यांना समजावू  दिले. 
महाविद्यालयाचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना वाचन करणे व उच्चशिक्षण घेणे याचा मानवी जीवनावर काय फरक पडतो हे पटवून दिले. 
विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर वक्तृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्ध्येमध्ये उत्स्फुर्तपणे साहभाग घेतला, तसेच प्रमुख पाहुणे व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ .रूपाली बेंदगुडे यांनी औषधी झाडांचे वृक्षारोपण केले. 

या वेळी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष. श्री बाबा येडगे, प्रा. प्रशांत मिसळ, प्रा. शिवराज ढगे, प्रा. महादेवी भोसले व आदी मान्यवर उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. स्वाती पाटील व प्रा. कोमल यादव यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा