उमरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा : दि.२८-एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उमरा येथे विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी गावातील प्रतिष्ठित नागरिक मा.संदीप पाटील उमरेकर मा.ब्रह्मानंद पाटील सिरसाट यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहन करण्यात आले.
जयंतीचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार बालाजी पाटील सिरसाट यांनी संभाजी ब्रिगेडच्या वैचारिक माध्यमातून त्यांनी यावर्षी एक आगळा-वेगळा उपक्रम म्हणून महामानवांची जयंती नाचुन नाही तर वाचुन साजरी करू हा एक सामाजिक उपक्रम हाती घेऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र्यावरील पुस्तके उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.तसेच दिवसभर भीमजन्मोत्सव समितीच्या आयोजनातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी गुरुराव पाटील सिरसाट,नागोराव पाटील सिरसाट,गोविंदराव सिरसाट,माधवराव वडजे,एम.डी.सिरसाट डॉ.सूर्यकांत सिरसाट,आनंदराव सिरसाट,अशोक वडजे,दादाराव पवार,सचिन सिरसाट, अविनाश सिरसाट,रामेश्वर सिरसाट,मारोती सिरसाट,आनंदा वाघमारे,गोविंदराव सोनटक्के,शिवाजी पांचाळ,व्यंकटी पट्टेकर,सुरेश पट्टेकर,धर्माजी सोनटक्के,रमेश जोगदंड,दिपक सोनटक्के,शंकर पट्टेकर,भगवान जोगदंड,रवी सोनटक्के,नितीन पट्टेकर,कैलास पट्टेकर,रत्नदीप पट्टेकर,रवी जोगदंड,परमेश्वर जोंधळे,जितेंद्र पट्टेकर,मधुबाला ढवळे,समिक्षा जोगदंड,श्रुती सोनटक्के यांच्यासह
येथे मोठ्या संख्येने महिला,नागरिक अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा