सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर बताले यांच्या पाठपुरावाला अखेर यश
प्रतिनिधी:- अजित चव्हाण
नळदुर्ग:- नळदुर्गचे आराध्य दैवत व प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या रोकड्या हनुमान मंदीर परिसरातील ठेकेदारांनी अर्धवट ठेवलेले विकास कामे नगर परिषद प्रशासनाने तात्काळ पूर्ण करून घ्यावेत असे आदेश नळदुर्ग नगरपरिषदचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी ठेकेदाराला दिले आहे. तसेच ठेकेदाराला पत्र सुद्धा दिले आहे. राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या रोकड्या हनुमान मंदिर या परिसरात अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करून घ्या अन्यथा १ मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा भीमाशंकर बताले यांनी नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना दिला होता. मुख्याधिकारी यांनी सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर बताले यांची निवेदनाची दखल घेतली आहे. आणि अर्धवट राहिलेले काम तातडीने एक महिन्यात पूर्ण करा असे आदेश नळदुर्ग नगरपरिषदचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी ठेकेदाराला दिले आहे. तसेच मंदिर परिसरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा