तुळजापूर खुर्द येथील श्री तुळजाभवानी मंदिराचा कळसारोहण कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर खुर्द येथील श्री तुळजाभवानी मंदिराचा कळसारोहण कार्यक्रम संपन्न... आज दि. २८/०४/२२ रोजी सकाळी स्थापित देवता चे पुजन यजमान सौ. व श्री.अजित नाईक व मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सौ व श्री विलास जगदाळे यांच्या हस्ते होम हवनचे पूर्णाहुती होऊन महाआरती करून कळसारोहण चा कार्यक्रम जगद्गुरू श्री शंकराचार्य महाराज, करवीर पीठ (कर्नाटक) यांच्या हस्ते व महंत वाकोजी बुवा व हजारो भावीक भक्तांच्या उपस्थितीत पार पडला व महाप्रसादचा जवळपास ५000 भाविक भक्तनी घेतला. यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर चे स्वप्नपूर्तीचे जनक माजी मंत्री श्री.मधुकरराव चव्हाण साहेब,ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस गोकुळ शिंदे,जि.प.माजी उपाध्यक्ष सौ.अर्चनाताई पाटील,जि प.अध्यक्ष अस्मिताताई कांबळे,पवन राजे मल्टी स्टेट को ऑप सोसायटी चेअरमन जय राजेनिंबाळकर, पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद साहेब,तहसीलदार सौदागर तांदळे साहेब, नायब तहसीलदार जाधव साहेब,पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जनराव साळुंखे,तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा नगरसेवक अमरभैय्या मगर,नगरसेवक सुनीलपिंटू रोचकरी,तुळजापूर प्राधिकरण सदस्य नागेश नाईक व भावीक भक्त, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्व तुळजापूर खुर्द ग्रामस्थ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. मंदिर चे शिखर बांधकाम करणारे संभाजी आलमले व त्याचे सहकारी यांचा भर पेहराव देऊन सत्कार करण्यात आला,व रात्री सुप्रसिद्ध गायक नंदकुमार कदम यांच्या गोंधळी गीताचा संगीत कार्यक्रम व ह भ प दगडू महाराज भुजबळ यांची कीर्तन सेवा झाली व श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट व तुळजापूर खुर्द ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या कळसारोहण सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानन्यात आले व कळसारोहण विधी सोहळा संपन्न झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा