Breaking

शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

खटाळ डॉक्टर पत्नीचा जाचहाट ;डॉक्टर पती,सासू व सासरा यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल*


खटाळ डॉक्टर पत्नीचा जाचहाट ;डॉक्टर पती,सासू व सासरा यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 


टेंभुर्णी : - लग्नात मानपान केला नाही व भारी कपडे न घेतल्यामुळे डॉक्टर पत्नीचा छळ केला.तसेच तुझ्या आई वडीलाकडून दहा तोळे सोने व पैसे आण म्हणून उपाशी ठेवले.शिवीगाळ,दमदाटी करून हाताने मारहाण केली.यामुळे डॉक्टर पत्नीच्या फिर्यादीवरून पती,सासरा व सासू यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी डॉक्टर सुप्रिया महादेव खटाळ रा.साकात ता.बार्शी (हल्ली रा. टेंभुर्णी) यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,त्यांचे लग्न १० जून २०१७ मध्ये महादेव रमेश खटाळ यांच्याबरोबर झालेले असून लग्नानंतर दोन महिन्यानंतर डॉक्टर पती महादेव रमेश खटाळ,सासरा रमेश अंबादास खटाळ व सासू शारदा रमेश खटाळ सर्व रा.साकत ता.बार्शी.
जि सोलापूर यांनी लग्नात चांगला मानपान केला नाही.भारी कपडे घेतले नाहीत.
यासाठी माहेराहून दहा तोळे सोने व पैसे आण अशी मागणी करीत शारीरिक मानसिक छळ केला.उपाशी ठेवून शिवीगाळ,दमदाटी करून हाताने मारहाण केली अशा आशयाची फिर्याद :::2टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दोन दिवसापूर्वी दाखल केली आहे.डॉक्टर सुनेच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलिसांनी पती,सासरा व सासू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पो.हे.कॉ.गोळे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा