Breaking

गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

.आ.विनायकरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त के.एन.भिसे महाविद्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन




.आ.विनायकरावजी  पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त   के.एन.भिसे महाविद्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन 



कुर्डुवाडी:- माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय मा.आमदार विनायकरावजी पाटील ऊर्फ बापू यांच्या ७९ वाढदिवसानिमित्त भिसे महाविद्यालतील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहून, जनसेवेचे सेवक म्हणून काम करणारे, रक्तदान हेच जीवनदान या उक्तीप्रमाणे एनसीसी विभागाने रक्तदान शिबीराचे आयोजन केले.याप्रसंगी एनसीसी विभागातील ४२ एनसीसी कॅडेटनी गुरुवार दिनांक 28/04/२०२२ रोजी रक्तदान केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.आ. विनायकरावजी पाटील, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.एस.कांबळे, एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ.एम.एस.थोरात, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका ,कर्मचारी व सर्व एनसीसी कॅडेट हजर होते.
     तसेच कुर्डूवाडी ब्लड बँक, कुर्डूवाडी येथील कपिल हिंगमिरे व त्याचे सर्व स्टाफ यांनी सर्व सहकार्य करुन रक्तदान शिबिर व्यावस्थित पार पाडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा