टाकळी (टें) येथील दोन जनांवरती ॲट्रॉसिटी दाखल
ऊस तोडीच्या पैशाचे हिशोबाचे कारणावरुन झाले भांडण
माढा (प्रतिनिधी):- ऊस तोडीच्या पैशाचे हिशोबाचे कारणावरुन टाकळी (टें) ता.माढा येथील दोघा जणांनवरती (ॲट्रॉसिटी) अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
टेंभुर्णी पोलीस स्टेशन कडून मिळालेली अधिक माहिती अशी दिनांक 27/04/2022 रोजी सकाळी 07/00 वा.चे दरम्यान आरोपी दादासाहेब बबन कळसाईत व नवनाथ बबन कळसाईत दोघे रा.टाकळी टें ता.माढा यांनी ऊस तोडीच्या पैशाचे हिशोबाचे कारणावरुन
फिर्यादी सुधीर सुऱेश सोरटे रा.टाकळी टें, ता.माढा यांचे घरासमोर आले व फिर्यादीस म्हणाले की तुझ्याकडे फिरत असलेले पैसे दे.असे म्हणुन शिवीगाळी करु लागले. तेव्हा फिर्यादी त्यास म्हणाले की, तुम्ही तुमच्या मेव्हण्याच्या नावावर घालवलेल्या ऊसाचा हिशोब केलाय तुमच्या नावावर घालवलेल्या ऊसाचा हिशोब करा. तुमच्या कडेच फिर्यादीचे पैसे फिरतात असे म्हणालेवर फिर्यादीस जाती वाचक बोलून तुम्हाला भिऊन चालते का? आम्ही केलेला हिशोब बरोबर आहे. फिर्यादीकडे सोळा हजार रुपये फिरतात असे म्हणुन अंगावर येवुन जातीवाचक शिवीगाळी करुन हाताने फिर्यादीस मानेवर मारुन फिर्यादीस केसं धरुन ओढुन खाली पाडले. अशी तक्रार फिर्यादी सुधीर सुऱेश सोरटे यांनी दिली आहे. त्यांचे वरती दिनांक 27/4/2022 रोजी (ॲट्रॉसिटी) अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास मा.उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ विशाल हिरे हे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा