Breaking

बुधवार, २७ एप्रिल, २०२२

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल बहुजन समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध, भिम-अण्णा सामाजिक संघटनेचे उमरगा पोलीस स्टेशनला निवेदन*



*संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल बहुजन समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध, भिम-अण्णा सामाजिक संघटनेचे उमरगा पोलीस स्टेशनला निवेदन*

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या सकल बहुजन समाजावर ज्यांच पोट रोजच्या रोज काबाड कष्ट केल्याशिवाय भरत नाही अशा समाजावर वारंवार वाढत चाललेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध धाराशिव जिल्ह्यामधील लोहारा तालुका,उमरगा तालुका व नळदुर्ग शहर या ठिकाणी तहसील कार्यालय व पोलिस कार्यालयांमध्ये भिम-अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.
 बहुजन समाजावर अन्याय अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला कायद्याच्या माध्यमातून आळा बसवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. अन्यथा सकल बहुजन समाज रस्त्यावर उतरून आक्रोश मोर्चा काढल्याशिवाय शांत राहणार नाही अशी चेतावणी देण्यात आली.
यावेळी भिम-अण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे, धर्मराज देडे, विद्यासागर ढोबळे, महादेव मोरे महाराज, दयानंद शिंदे, आण्णा जाधव , सुजित शेंडगे, तुषार भिसे,गोटन भिसे,अजय भिसे, संतोष हणवते आदी समाज बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा