Breaking

शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२

सुप्रियाताई सुळे यांनी पं. स.बारामती च्या माजी सभापती नंदाताई खैरे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेतली*



*सुप्रियाताई सुळे यांनी पं. स.बारामती च्या माजी सभापती नंदाताई खैरे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेतली*


बारामती तालुक्याच्या पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमती नंदाताई विलासराव खैरे यांचे चिरंजीव कै. राहुल विलासराव खैरे यांचे रविवार दिनांक 10/04/2022 रोजी अपघात झाला बारामती व नंतर पुणे  येथे उपचारादरम्यान  त्यांचे बुधवार दिनांक 13/04/2022 रोजी निधन झाले
आज माननीय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांचा दौरा दौंड,बारामती येथील काही गावात असताना त्यांना ही बातमी कळताच सायंकाळी 6 च्या सुमारास त्यांनी सुपे खैरेपडळ येथील नंदाताई खैरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले अपघाताची चौकशी करत असताना राहुल चा अपघात कसा झाला त्याचे पुढे काय झाले कोण होते पोलीस तपास व्यवस्थित होत आहे ना विचारपूस केली तसेच त्याच्या कुटुंबाविषयी चौकशी करत असताना त्याच्या पत्नी व मुलाची जवळ बोलावून संत्वन केले तसेच नंदाताई खैरे यांना आधार देत त्यांचे धाकटे चिरंजीव राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते श्री अतुल खैरे यांना आपल्या कुटुंबाला सावरण्यास सांगितले व इतर कुटुंब नातेवाईकांची चौकशी करून या घटनेतून सावरण्यास सांगून राहुलच्या कुटुंबास आधार देण्यास सांगितले पवार व खैरे तसेच नंदाताई यांच्या माहेरच्या रसाळ यांचा कौटुंबिक जिव्हाळा असल्याने ताईंनी ही गोष्ट आपल्या आई यांच्या कानावर घालते व आई इकडे आल्यानंतर तुम्हाला कल्पना देत भेट घडून देते असेही नंदाताई खैरे यांना सांगितले  याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी नाना होळकर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा