Breaking

शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

इलेक्ट्रिक तारेचा शाॅक लागून एकाचा जागीच मृत्यू



इलेक्ट्रिक तारेचा शाॅक लागून एकाचा जागीच मृत्यू 


मोहोळ प्रतिनिधी - कंटेनरच्या दरवाजाला इलेक्ट्रिक तारेचा स्पर्श झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रमोळी औद्योगिक वसाहती मध्ये ग्लेन मार्क या कंपनी समोर घडली आहे . 

याबाबत मोहोळ पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार - औरंगाबाद येथील कंटेनर क्रमांक -  एम एच २० .इजी ४४६९ .  हा  मोहोळ येथील चंद्रमौळी औद्योगिक वसाहती मधील ग्लेन मार्क कंपनीमध्ये प्लास्टिकचे स्क्रॅप भरण्यासाठी आला होता सदर वाहनांमध्ये स्क्रॅपचे मटेरियल भरून कंटेनर गाडी कंपनी बाहेर लावून थांबले आसता कंटेनरचा दरवाजा उघडा असल्याने तो दरवाजा बंद करीत असताना शेजारून गेलेल्या मेन लाईनच्या तारांचा स्पर्श दरवाजाला झाल्याने  पप्पुकुमार गौतम रमनिवर ( वय २७ ) रा जिगनामापी . ता . इटवा . जिल्हा सिध्दार्थ नगर ( युपी ) याचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत गुलाम नबी खान .रा .भरकलगेट . औरंगाबाद याने मोहोळ पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलिस करीत आहेत .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा