Breaking

सोमवार, २५ एप्रिल, २०२२

श्री गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये पालक सभा संपन्न .



श्री गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये पालक सभा संपन्न .


मौजे. अकोले खुर्द तालुका माढा येथील श्री गणपती औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयामध्ये शिक्षक - पालक सभा घेण्यात आली. पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीचा लेखाजोखा मांडणे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पालक प्रतिनिधी श्री. अंगद नागटिळक व सौ. सविता बिनगे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. या वेळी प्रा. शिवराज ढगे यांनी महाविद्यालयाची तसेच महाविद्यालयात आयोजित केलेल्या वृक्षारोपन, रक्तदान शिबीर, पोस्टर प्रेसेंटेशन, सांस्कृतीक कार्यक्रम, प्रतिष्ठित औषधनिर्माण कंपनी  व रुग्णालयास दिलेली भेट व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल माहिती पालकांना दिली या वेळी संस्थेचे सचिव डॉ. आर. डी.  बेंदगुडे यांनी पालकांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निरसन केले. 
पालक प्रतिनिधी श्री अंगद नागटिळक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की गणपती फार्मसी महाविद्यालयाने खूप कमी वेळेत मोठी प्रगती केली आहे, या ग्रामिण विभागात असणारी उच्च शिक्षणाची गरज ही या विद्यालयाने पूर्ण केली आहे. 
पालकांमधून श्री सुजित जोशी, श्री. तुकाराम जानकर, श्री. केरबा मेहेर, श्री. संदीप हुलगे यांनी हितगूज केले यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबासाहेब येडगे,प्रा.दिव्या ओस्तवाल, प्रा. मोनिका माळी, प्रा. रूपाली राऊत व  पालक वर्ग उपस्थित होते ,कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. केतकी पाटील या होत्या तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती पाटील यांनी केले व आभार प्रा. कोमल यादव यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा