Breaking

गुरुवार, १४ एप्रिल, २०२२

*श्री सुमित संजय म्हमाने यांचा वडगाव (काटी) ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला*




*श्री सुमित संजय म्हमाने यांचा वडगाव (काटी) ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


 वडगाव च्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणून श्री सुमित संजय म्हमाने यांनी नेपाळ येथे झालेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धा टी 20 भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून नेतृत्व केले व उपविजेता पद मिळवले त्याबद्दल वडगांव काटी ग्रामपंचायत मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी वडगाव चे माजी सरपंच श्री बिरूदेव लोकरे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.तसेच ग्रामपंचायत वडगाव का टी यांच्या पाणलोट विकास समितीच्या अध्यक्षपदी श्री अनंतराव राऊत यांची बिनविरोध निवड करून त्यांचा सत्कार श्री विनोद कोडगीरे यांनी केला व सर्वांनी यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी वडगाव चे विद्यमान सरपंच श्री गौरीशंकर कोडगीरे , उपसरपंच प्रकाश डावरे, माजी सरपंच बीरुदेव लोकरे, दिनेश सावळे, विनोद कोडगीरे, नागेश अस्वले दिनेश अस्वले, राहुल महमने बाबा मुलाणी, अजीम फकीर , शामिर मुलाणी, सोमनाथ सावळे,भाऊ सावळे, नागेश पाटील,रोहित अस्वले ,योगेश अस्वले,अजय कोडगीरे, अभिषेक कोडगीरे, तानाजी भोसले ओंकार, कापसे,आकाश चूंगे , चांद पठाण, शंकर राऊत, हुसेन टेलर,मनोज डावरे, इत्यादी मित्रमंडळी उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा